Friday, January 27, 2023

नवी दिल्लीत 2 हजार जिवंत काडतुसे जप्त, 6 जणांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या दोनदिवस अगोदर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे 2 हजार जिवंत काडतुसांचा मोठा साठा जप्त केला असून काडतुसांचा पुरवठा करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देशात 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून, त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. या विशेष महोत्सवासाठी देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम देखील राबवली जाणार आहे. दरम्यान, या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

- Advertisement -

या दरम्यान आनंद विहार परिसरात दोन संशयितांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयिताची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2000 जिवंत काडतुसे असलेल्या दोन पिशव्या सापडल्या. यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्यासह अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे. संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.