महाराष्ट्रात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जूनपासून : आ. चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली नविन शैक्षणिक जाहीर केलेले होते. संपूर्ण देशात एकच (काॅमन) तीन वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले.

कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मंत्री श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, मुख्याध्यापक गोकुळ अहिरे, शताब्दी महोत्सव माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष अॅड. सदानंद चिंगळे, टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद पेंढारकर आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/watch/?v=568544984826544&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB&ref=sharing

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात मूळ विचार माहिती होतील, असा नागरिक तयार होईल. भगवद्गीता हा हिंदूचा किंवा एका धर्माचा ग्रंथ नाही, तर तो जगाला कसे जगावे अन् कसे जगू नये असे सांगणारे तत्वज्ञान आहे. परंतु ते आमच्या अभ्यासक्रमात नाही. छ. शिवाजी महाराजांचा शाैर्य मोठे आहे, मात्र त्यांचा धडा दोन पानी आहे. घटना लिहिणाऱ्या व हजारो वर्षे ती बदलवणारी लागणार नाही त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा धडा एक पानी अशी खंत व्यक्त केली. तसेच आताच्या अभ्यासक्रमात फाफटपसारा आहे, कुठे इंग्लड, इंडोनियाचा भूगोल आहे, त्याचे आम्हांला काय करायचे आहे.

https://www.facebook.com/watch/?v=556302786400862&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB&ref=sharing

संस्थेने प्रस्ताव तयार करावा, निधी दिला जाईल : मंत्री. चंद्रकांत पाटील 
एखादी संस्था स्थापन करणे सोपे असते, त्यासाठी कागदपत्रे गोळा करणे. परवानग्या घेणे अन् संस्था स्थापन होते. परंतु ती सलग 100 वर्षे चालविणे सोपे नसते. अनेकदा गमतीने असे म्हणतात संस्थेचा नारळ फुटला मग आता संस्था कधी फुटणार असे म्हणतात. मीही या संस्थेची जोडलेलो आहे. कन्या शाळेत विद्यार्थी परिषदेचे कार्यालय पूर्वी होते. तेथे मी यायचो, तेथे पुस्तक चळवळ मोठ्या प्रमाणावर होती. संस्थेला आज केवळ काही रक्कम न देता मी प्रस्ताव तयार करायला सांगतो, निधी दिला जाईल. अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.