New Pune Bangalore Expressway : नवीन पुणे- बंगळुरू हायवे!! 50 हजार कोटींचा प्रोजेक्ट; 7 तासांचा प्रवास वाचणार

New Pune Bangalore Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन New Pune Bangalore Expressway। नवीन पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे ते बंगळुरू प्रवासाचा ताण हलका करणारा हा महामार्ग २०२८ पासून प्रवाशांच्या सेवेत येईल. हा नवा महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा आहे. हा एक्सप्रेसवे पंतप्रधान-भारतमाला परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विकसित केलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उपक्रमांपैकी एक असून यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील प्रवाशी वाहतूक आणखी मजबूत होणार आहे. सध्या, बेंगळुरू आणि पुणे दरम्यानच्या रस्त्याने प्रवास करण्यासाठी सुमारे १५ तास लागतात. एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी सुमारे ७ तासांपर्यंत कमी केला जाईल ज्यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांहून अधिक कमी होईल.

12 जिल्ह्यातून जाणार नवा महामार्ग – New Pune Bangalore Expressway

नवीन पुणे बंगळुरू एक्सप्रेसवे (New Pune Bangalore Expressway) हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील बारा जिल्ह्यांमधून जाईल, ज्यामुळे दोन्ही राज्यातील इंटरकनेक्टिव्हिटी वाढेल. महाराष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, हा मार्ग प्रस्तावित पुणे रिंग रोडवरील कांजले येथून सुरू होईल आणि पुणे, सांगली, सातारा मधून जाईल. तर कर्नाटक मधील बेळगाव जिल्हा (अथणी), जमखंडी, बागलकोट, बदामी, मुधोळ, नरगुंड, गदग जिल्हा (रॉन), येलाबुर्गा (कोप्पल जिल्हा), कुडलिगी (विजयनगर जिल्हा), जगलुरू (दावणगेरे जिल्हा), मधुगिरी, चित्रदुर्ग तालुका, कोरटागेरे इ. भागांमधून हा नवा एक्सप्रेसवे जाणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

नवीन पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे (New Pune Bangalore Expressway) आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून बांधला जात आहे, या महामार्गाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, या ६ पदरी महामार्गावरून तुम्ही १२० किमी/ताशी वेगाने प्रवास करू शकाल. ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा एक्सप्रेस वे पश्चिम महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल. या एक्सप्रेस वे मुळे पुणे ते बेंगलोर या दरम्यानचे जवळपास 95 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. परिणामी पुणे ते बेंगलोर हा प्रवास वेगवान होईल. या नवीन महामार्गामुळे अनेक ग्रामीण व शहरी भागांना नवसंजीवनी मिळणार आहे. पुणे बंगळुरू नवीन एक्सप्रेस वे मुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील वस्तू आणि सेवा क्षेत्राला चालना मिळेल. यामुळे व्यापार जलद होईल. रस्ता चांगला झाल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. दोन्ही राज्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.