New Rule For Simcard | अनेकवेळा आपणआपले सिम कार्ड दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्वॅप करतो. या प्रक्रियेला MNP म्हणतात. परंतु आता ज्या लोकांना त्यांचे सिम स्विच करायचे आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता 1 जुलैपासून नवीन मार्गदर्शक तत्त्वावर सिम स्विच किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी युजर्सना किमान सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही नवीन सिम कार्ड विकत घेतल्यास किंवा सिम पोर्ट केले असल्यास ते चालू होण्यासाठी तुम्हाला सात दिवस वाट पहावी लागणार आहे.
मोबाईल नंबर पोर्टिबिलिटी म्हणजे काय? | New Rule For Simcard
मोबाईल नंबर पोर्टिबिलिटी ही एक अशी सेवा आहे. ज्यामध्ये मोबाईल फोन युजर्स त्यांचा फोन नंबर तोच ठेवून नवीन नेटवर्कमध्ये स्विच करण्याची परवानगी घेते. युजर्स कोणत्याही ठिकाणी एका ऑपरेटरवरून सिम एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्विच करू शकतात. म्हणजेच तुम्ही जिओचे सिम कार्ड एअरटेलमध्ये स्विच करू शकता. किंवा एअरटेलचे सिम कार्ड जिओमध्ये स्विच करू शकता. परंतु तुमचा फोन नंबर बदलत नाही तोच राहतो.
इथून पुढे तुम्हाला तुमचा नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्विच करायचा असेल, तर तुम्हाला सात दिवसाची वाट पहावी लागणार आहे. परंतु हा नियम कधीपासून चालू होणार आहे. याची निश्चितच तारीख सांगितली नाही तरी देखील ट्रायने आधीसूचना दिली आहे. आणि त्यात सांगितलेले आहे की, सार्वत्रिक निवडणुकानंतर हा नवीन कायदा लागू होणार आहे. तसेच बायोमेट्रिक वेरिफिकेशन शिवाय तुम्हाला कोणतीही नवीन सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. हे नियम फिजिकल सिम आणि ईसीमरही लागू होतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही 90 दिवस तुमच्या सिम कार्ड वापरले नाही, तर तुमचे सिम कार्ड कायमचे ब्लॉक होऊ शकते. सायबर फ्रॉड आणि कॉल्सपासून सुटका मिळवण्यासाठी हे नियम केलेले आहेत.