रेल्वे स्थानकांवर नवा नियम! कन्फर्म तिकीटधारकांनाच प्रवेश, गर्दीवर नियंत्रणासाठी मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरी आणि प्रवाशांचा गैरसोय हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये ही समस्या अधिक गंभीर होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील 60 रेल्वे स्थानकांवर फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी ‘लिमिटेड एंट्री सिस्टिम’

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या मते, रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी ‘लिमिटेड एंट्री कंट्रोल सिस्टिम’ लागू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत:

वेटिंग लिस्ट आणि विनातिकीट प्रवाशांना स्टेशनमध्ये प्रवेश नाही. त्यांना बाहेरील वेटिंग एरियामध्ये थांबावे लागेल.

  • सुरत, उधणा, पाटणा आणि नवी दिल्ली स्थानकांवर हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर, आता देशभरातील 60 रेल्वे स्थानकांवर ही प्रणाली कायमस्वरूपी लागू करण्यात येईल.
  • अनधिकृत प्रवेशद्वार बंद करून गर्दी नियंत्रणासाठी वॉर रूम आणि डिजिटल संचार प्रणालीचीही मदत घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत केली जाणार

रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळीही प्रवाशांना सुरक्षित वाटावे, यासाठी 12 मीटर आणि 6 मीटर लांबीचे नवीन डिझाईन असलेले फुट ओव्हर ब्रिज (FOB) उभारण्यात येणार आहेत.

‘वॉर रूम’ आणि नवीन तंत्रज्ञान

रेल्वे स्थानकांवरील गर्दीच्या वेळी संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष वॉर रूम उभारण्यात येईल. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचे सर्व अधिकारी समन्वयाने काम करतील. तसेच, वॉकी-टॉकी, अनाउंसमेंट प्रणाली आणि डिजिटल संचार प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

नवा नियम कधी लागू होणार?

हा निर्णय 60 रेल्वे स्थानकांवर टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास अनुभव मिळावा, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. कन्फर्म तिकीटधारकांना आता अनावश्यक गर्दीपासून मुक्ती मिळेल, पण वेटिंग लिस्ट असलेल्यांनी आता स्टेशनबाहेरच वाट पाहण्याची तयारी ठेवावी लागेल