New TVS Jupiter : TVS ज्युपिटर नव्या अवतारात लाँच; Activa ला देणार टक्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी TVS ची ज्युपिटर स्कुटर बाजारात चांगलीच लोकप्रिय असते. तुम्हाला प्रत्येक शहरात किंवा अगदी गावखेड्यात TVS ज्युपिटर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. आता कंपनीने आपली हीच ज्युपिटर (New TVS Jupiter) नव्या अवतारात लाँच केली आहे. TVS ने जवळपास १० वर्षानंतर ज्युपिटर अपडेटेड मॉडेल यामध्ये आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना तिच्या या नव्या अवताराचे कुतूहल नक्कीच असेल. आज आपण या स्कुटरचे खास फीचर्स, इंजिन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

इंजिन –

नवीन TVS ज्युपिटर 110 स्कूटरमध्ये 113.3 cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 6500 rpm वर 5.9 kW ची कमाल पॉवर आणि 5,000 rpm वर 9.8 न्यूटन मीटरची पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की नवीन ज्युपिटरमध्ये iGO असिस्ट फीचर देण्यात आलं असून यामुळे हि स्कुटर 10 टक्के जास्त मायलेज देईल.

लूक आणि डिझाईन – New TVS Jupiter

स्कुटरच्या (New TVS Jupiter) डिझाईनबाबत सांगायचं झाल्यास, नवीन TVS ज्युपिटर 110 मध्ये इन्फिनिटी लाइटिंग बार, टर्न इंडिकेटर सोबत LED DRL देण्यात आले यामुळे समोरच्या बाजूने अतिशय आकर्षक असा लूक दिसतोय. साईडने सुद्धा टीव्हीएस ची नवी ज्युपिटर अतिशय आकर्षक दिसते. LED डिस्प्ले मध्ये बरीच माहिती तुम्हाला दिसेल. यात ब्लूटूथ इंटिग्रेशन देखील आहे ज्याचा वापर स्मार्टफोनवर राइड डेटा पाहण्यासाठी केला जाऊ शकतो. यात फ्रंट स्टोरेज बॉक्स, सीटखाली भलीमोठी जागा देण्यात आली आहे ज्यामध्ये दोन फुल फेस हेल्मेट ठेवता येतात. म्हणजेच मोठ्या बूट स्पेससह ही स्कूटर तयार करण्यात आली आहे.

किंमत किती?

नवीन TVS ज्युपिटर 73700 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झाली आहे. हि स्कुटर ड्रम, ड्रम अलॉय, ड्रम SXC और डिस्क SXC अशा ४ व्हॅरिएन्ट मध्ये आणि एकूण 7 रंगात बाजारात दाखल झाली आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये नवीन TVS ज्युपिटर होंडा ऍक्टिव्हा, बजाज, हिरो मेस्ट्रो, होंडा डियो या स्कुटरना थेट टक्कर देईल.