New Vande Bharat Express : पुण्याहून धावणार 4 वंदे भारत ट्रेन; कोणकोणत्या शहरांना जोडणार पहा

xr:d:DAGA-aQBh7M:94,j:4783246709725337037,t:24040510
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

New Vande Bharat Express : पूर्णपणे मेड इन इंडिया असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. या ट्रेनची लोकप्रियता बघता लवकरच वंदे भारत स्लीपर कोच सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. एवढेच नाही तरयाच प्रकारची ट्रेन भारताच्या बाहेर सुद्धा निर्यात केली जाणार आहे. सध्या भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 45 मार्गावर एकूण 51 वंदे भारत एक्सप्रेस (New Vande Bharat Express) धावतात. तर महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस राज्यामध्ये धावतात.

पुण्याला नव्या ४ वंदे भारत मिळण्याचे संकेत (New Vande Bharat Express)

महाराष्ट्रात धावणाऱ्या आठ मार्गावरील फक्त एक मार्ग हा पुण्यातून जातो. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत पुणे मार्गे जाते. ही एकमेव वंदे भारत ट्रेन सध्या पुणेकरांना वापरता येते. मात्र सध्या तरी पुण्यातून म्हणजेच पुणे स्थानकामधून कोणतीही वंदे भरत ट्रेन धावत नाही. मात्र आता लवकरच पुण्याला काही नवीन ट्रेन्स बरोबर वंदे भारत ट्रेनच्या दुरुस्तीचे केंद्रही मिळणार आहे अशी माहिती आहे.

2024- 25 मध्ये पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र पुण्यात ज्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे -शेगाव, पुणे- बडोदा, पुणे -सिकंदराबाद आणि पुणे- बेळगाव अशा चारमार्गांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याशिवाय या चारही वंदे भारत गाड्या या वर्षाच्या शेवटपर्यंत (New Vande Bharat Express) म्हणजे डिसेंबर 2024 पर्यंत किंवा आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी म्हणजेच 2025 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट मधून देण्यात आली आहे.

घोरपडीत वंदे भारतचे वर्कशॉप (New Vande Bharat Express)

याशिवाय दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुणे येथील घोरपडी इथं वंदे भारत चे डबे दुरुस्त करण्यासाठीच वर्कशॉप सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे. याबाबतचे संकेत पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली असल्याची माहिती हिंदुस्थान टाइम्सने दिली आहे. याबाबत बोलताना दुबे यांनी माध्यमांना म्हंटले आहे की, “पुणे सिकंदराबाद पुणे बडोदा मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे बोर्डाने या संदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. पुढील काही महिन्यांमध्ये लगेच इथून वंदे भारत सुरू होण्याची (New Vande Bharat Express) शक्यता नगण्य आहे मात्र वंदे भारत ट्रेन साठी कोच डेपोची आवश्यकता आहे. यासाठीच्या निविदा काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असं दुबे यांनी म्हटल आहे. हे वर्कशॉप बनण्यासाठी जवळपास 89 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.