पुढील वर्षी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा थरार : रुपाली गंगावणे, शुभांकर खवले सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरमवीर सिंह, विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक महेंद्र चेंबूरकर, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष अभिजीत भोसले, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष मोहन झुंजे पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्षा राघवेंद्र बापू मानकर, आबासाहेब पटवर्धन क्रीडानगरीचे विश्वस्त सोमनाथ तेंडुलकर, शाहू कला क्रीडा अकादमीच्या संचालिका प्राध्यापिका अनुराधा ऐडके, सचिव राज तांबोळी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम स्पर्धा :- रुपाली गंगावणे (मुंबई उपनगर) नेहा क्षीरसागर (सातारा), दृती प्रभू (मुंबई उपनगर), खुषी पुजारी (मुंबई), दिलीषा जैन (मुंबई उपनगर), हार्दिका शिंदे (मुंबई उपनगर) यांच्यात रंगली. मुलांमध्ये शुभांकर खवले (पुणे), चेतन मानकर (जळगाव), शार्दुल ऋषिकेश (मुंबई उपनगर), आदित्य पाटील (मुंबई शहर), निशांत लोखंडे (मुंबई उपनगर), निरंजन अमृते (मुंबई शहर) यांच्यात पाहायला मिळाली.

या स्पर्धेतील‌ १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील पोल मल्लखांबमध्ये‌ :- हृदया दळवी (प्रथम) प्रपित ढमाल (द्वितीय) आणि शिवानी देसाई (तृतीय) क्रमांक पटकावला. तर रोप मल्लखांब मध्ये सायली गोरे (प्रथम) देवांशी‌ पवार (द्वितीय), सई शिंदे (तृतीय) क्रमांक पटकावला. १६ वर्षांखालील मुलींच्या पोल आणि रोप मल्लखांब मध्ये दृष्टी प्रभू (प्रथम), वेदिका सावंत (द्वितीय), दिलीषा जैन (तृतीय) क्रमांक पटकावला.

याशिवाय १४ वर्षांखालील मुलांमध्ये पोल आणि रोप मल्लखांबमध्ये‌ :- विराज अंबरे (प्रथम), समर्थ पांचाळ, (द्वितीय) आणि श्रेयांश शिंदे, (तृतीय) क्रमांक पटकावला. तसेच १८ वर्षांखालील मुलांच्या पोल गटांत निशांत लोखंडे (प्रथम), निरंजन अमृते (द्वितीय) आणि मंथन मिर्लेकर (तृतीय) क्रमांक पटकावला. रोप मल्लखांब गटात पद्मनाभ आदमाने (प्रथम), शार्दुल ऋषिकेश (द्वितीय) आणि निरंजन अमृते (तृतीय) क्रमांक पटकावला.

१६ वर्षांवरील मुलींच्या गटात पोल आणि रोप मल्लखांबमध्ये :- रुपाली गंगावणे (प्रथम), नेहा क्षीरसागर (द्वितीय) ,पल्लवी शिंदे (तृतीय) क्रमांक पटकावला. तसेच १८ वर्षांच्या पोल आणि रोप मल्लखांबमध्ये‌ शुभांकर‌ खवले (प्रथम), चेतन मानकरे (द्वितीय) आणि आदित्य पाटीलने (तृतीय) क्रमांक पटकावला.