हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कॉलेजच्या तरुणांमध्ये सर्वात जास्त क्रेझ दिसून येते ती आयफोन वापरण्याची. परंतु आयफोन महाग असल्यामुळे तो प्रत्येकालाच घेणे शक्य होत नाही. मात्र आता तरुणांना आयफोनला देखील तोड देणारा स्मार्टफोन सर्वात कमी किमतीत विकत घेता येणार आहे. कारण की, बाजारात Infinix ने आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Infinix Smart 8 plus असे असून तो ग्राहकांना फक्त 6999 रुपयात विकत घेता येईल. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले फिचर्स जाणून घ्या.
फिचर्स आणि किंमत
नुकत्याच लॉन्च झालेल्या Infinix Smart 8 plus मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन आपल्याला Mediatek Helio G36 2.2 GHz Octa – Core प्रोसेसरबरोबर मिळत आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 6999 इतकीच आहे. आपल्याला कमी किमतीत फोनमध्ये 4GB स्टोरेज आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळत आहे. तसेच, हा स्मार्टफोन आपल्याला गॅलॅक्सी व्हाईट, टिंबर ब्लॅक आणि शायनी गोल्ड अशा 3 रंगांमध्ये विकत घेता येऊ शकतो.
इतकेच नव्हे तर, Infinix Smart 8 plus मध्ये आपल्याला 6.6 इंचीचा एचडी प्लस मिळेल. यात 90Hz Punch-Hole डिस्प्ले असेल. या स्मार्टफोनमध्ये मॅजिक रिंग ही देण्यात आली आहे. जी तुम्हाला iPhone 15 ची आठवण करून देईल. ही तुम्हाला चार्जिंग स्टेटस, इन कॉल टाइम आणि बॅटरी टक्केवारीची माहिती देईल. यासह फोनमध्ये MediaTek Helio G36 2.2 GHz Octa-Core प्रोसेसर देण्यात आले आहे. यात 4GB स्टोरेज आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त त्यात तुम्ही 2 TB चा मायक्रोएसडी कार्ड लावू शकता. असे अनेक विविध फिचर्स तुम्हाला फोनमध्ये देण्यात आले आहेत