NHM Mumbai Bharti 2024 | मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे . या ठिकाणी नोकरी करावी त्याचप्रमाणे इथे स्थायिक व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु अनेकांना हे परवडत नाही आणि त्यांचे मुंबईत नोकरी करण्याचे स्वप्न तसेच राहून जाते. परंतु आता ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई (NHM Mumbai Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवार सहभाग घेऊ शकतात. राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत 11 रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. ही मुलाखत 10 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे.
रिक्त पदे
- एपीडेमिओलॉजिस्ट
- बालरोग तज्ञ
- मानसोपचार तज्ञ
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता | NHM Mumbai Bharti 2024
- सल्लागार एपीडेमिओलॉजिस्ट – M.B.B.S. (M.D.)
- बालरोग तज्ञ – M.B.B.S. (M.D.) बालरोग
- मानसोपचार तज्ञ – M.B.B.S. (M.D.) मानसोपचार तज्ञ
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी
वयोमर्यादा
वरील सर्व पदांसाठी 45 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
कार्यकारी आरोग्य अधिकारी (N.U.H.M) कार्यालय एफ /दक्षिण विभाग पहीला मजला रूम नंबर – 13 डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परेल
निवड प्रक्रिया
- वरील पदांकरता मुलाखतीच्या आयोजन करण्यात आलेले आहे.
- त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या अर्जासह उपस्थित राहायचे आहे.
- मुलाखतीला येताना सोबत तुमचे शैक्षणिक कागदपत्र आणि बायोडाटा आणायचा आहे.
- 10 एप्रिल 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.