NIA ची मोठी कारवाई; केरळमध्ये PFI च्या तब्बल 56 ठिकाणी छापेमारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात (एनआयए) कडून सध्या छापासत्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने गुरुवारी ‘बेकायदेशीर आणि हिंसक कारवायां’संदर्भात बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित केरळमधील 56 ठिकाणांवर छापे टाकले.

यामध्ये पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीचे सात सदस्य आणि पीएफआयचे विभागीय प्रमुख, 12 जिल्ह्यांतील 15 शारीरिक प्रशिक्षक आणि सात कॅडर यांच्या निवासस्थानांचा छापासत्रात समावेश होता. यावेळी एनआयएला संबंधित लोक चाकू, तलवारी आणि इतर शस्त्रे हत्येसाठी वापरण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी माहितीमिळाली होती.

त्यानंतर एर्नाकुलममध्ये 13, कन्नूरमध्ये 9, मलप्पुरममध्ये 7, वायनाडमध्ये 6, कोझिकोडमध्ये 4, तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि अलाप्पुझा येथे प्रत्येकी 3, त्रिशूर आणि कोट्टायममध्ये प्रत्येकी 2 आणि पलक्कडमध्ये 1 ठिकाणीही एनआयएकडून छापे टाकण्यात आले.