हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईवरील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वूर हुसैन राणाला अखेर भारतात आणण्यात आलं असून, त्याला 18 दिवसांची एनआयए (NIA) कोठडी सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या ताब्यातून खाजगी जेटने भारतात आणलेला राणा, पाकिस्तानातील दहशतवाद्यांना साथ देणारा महत्त्वाचा कट रचणारा मानला जातो. एनआयए त्याच्याकडून या हल्ल्यामागील कटाबाबत सखोल चौकशी करणार आहे. हि चौकशी करण्यासाठी NIA कडून काही प्रश्न काढण्यात आले आहेत अन याची संपूर्ण कुंडली काढण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवली आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राणासाठी ग्राउंड फ्लोरवर विशेष कक्ष –
एनआयए मुख्यालयात राणासाठी ग्राउंड फ्लोरवर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. पण , चौकशी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या खास रूममध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएच्या अधिकारी वर्गासोबतच स्पेशल सेलचे कमांडोज राणाच्या प्रत्येक हालचालीवर 24 तास नजर ठेवणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राणाची चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे, चौकशी दरम्यान एनआयएचे DIG, IG दर्जाचे अधिकारी थेट प्रश्न विचारणार आहेत.
तहव्वूर हुसैन राणाला विचारले जाणार हे प्रश्न –
तू 26 नोव्हेंबर 2008 रोजी कुठे होतास?
भारतात 8 ते 21 नोव्हेंबर दरम्यान तू का आला होतास आणि कुठे कुठे गेला होतास?
भारतात असताना कोणा-कोणाला भेटलास?
तुला 26 नोव्हेंबर मुंबई हल्ल्याची पूर्वकल्पना होती का?
तुझे आणि डेव्हिड कोलमन हेडलीशी काय संबंध होते?
हेडलीला भारतात बनावट व्हिसावर का पाठवले?
हेडलीसह तुझी भूमिका काय होती?
तू हेडलीला भारतीय व्हिसा मिळवून देण्यात कशी मदत केली?
हाफिज सईद तुला कसा ओळखतो? तुझे सईदशी संबंध काय होते?
लष्कर-ए-तैयबाला तू कशी मदत केलीस? तुला काय बदल्यात मिळाले?
लष्करचे नेटवर्क, त्यातील लोकांची भरती, प्रशिक्षण व शस्त्र पुरवठा कसा होतो?
आयएसआयची भूमिका काय होती? आयएसआयने हल्ल्यासाठी आदेश दिले का?
पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि लष्कर यांच्यातील संबंध कसे होते?
हल्ल्यांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांची माहिती – मेजर इक्बाल, समीर अली आणि इतर कोण?
आत्मघातकी हल्ल्यांसाठी मुलांना कसे तयार केले जाते?
हल्ल्याच्या संपूर्ण नियोजनामध्ये किती लोक सहभागी होते आणि त्यांची भूमिका काय होती?




