हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नामिबियाचा स्टार फलंदाज जान निकोल लॉफ्टी ईटनने (Nicol Loftie-Eaton) आंतरराष्ट्रीय T20 मध्ये मोठा विश्वविक्रम केला आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ३३ चेंडूत शतकी खेळी करत संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य आपल्याकडे वेधले. या खेळीदरम्यान त्याने नेपाळचा कुशल मल्ला आणि भारताच्या रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडीत काढला. रोहितने ३६ चेंडूत T20 सेंचुरी मारली होती.
कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाचव्या क्रमांकावर आलेल्या जान निकोल लॉफ्टी ईटनने चौफेर फलंदाजी करत नेपाळच्या गोलंदाजांचा घाम काढला. त्याने ३६ चेंडूत १०१ धावांची वादळी खेळी खेळली. या खेळी दरम्यान, जान निकोल लॉफ्टी ईटनने ११ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. त्याने सर्वात वेगवान शतकाच्या बाबतीत नेपाळच्या कुशल मल्लाचा विक्रम मोडला. मल्लाने 34 चेंडूत शतक ठोकले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे कुशल मल्लाने नामिबियाविरुद्धच ही कामगिरी केली होती.
नामिबियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 18.5 षटकांत 186 धावांच करू शकला. नेपाळ कडून दीपेंद्र सिंगने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर त्याखालोखाल रोहित पोडैलने 42, कुशल मल्लाने 32, सोमपाल कामीने 26 धावांची खेळी केली केल्या. नामिबियाने हा सामना 20 धावांनी जिंकला.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारे खेळाडू
१) जान निकोल लॉफ्टी ईटन – नामिबिया – 33 चेंडू
२) कुशल मल्ला- नेपाळ – 34 चेंडू
३) डेव्हिड मिलर- दक्षिण आफ्रिका – 35 चेंडू
४) रोहित शर्मा – भारत – 35 चेंडू