Nicotine | आजकाल अनेक लोक हे धूम्रपान आणि तंबाखूच्या आहारी गेलेले असतात. या धूम्रपान आणि तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे एक रसायन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होतो. परंतु आता या पदार्थांशिवाय बाकी असे अनेक खाद्यपदार्थ देखील आहेत. ज्यामध्ये निकोटिन (Nicotine) आढळते तसेच. निकोटिनमुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो का? असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. परंतु आज आपण निकोटीन आणि कर्करोग यांच्यातील नेमका संबंध काय आहे? आणि निकोटीन कोण कोणत्या खाद्यपदार्थांमध्ये आढळते? त्यापासून कसा बचाव करायचा? या सर्वांची माहिती पाहणार आहोत.
निकोटीन आणि कर्करोग संबंध | Nicotine And Cancer
निकोटीन हा थेट कर्करोगाला कोणत्याही कर्करोगाला कारणीभूत ठरत नाही. परंतु हे निकोटीन आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. तंबाखूमध्ये असणारे मेन रसायन हे निकोटीन असते. निकोटीनमुळे तंबाखूची चव तशी लागते. अनेक लोकांना निकोटिनचे व्यसन देखील लागते. त्यामुळे ते तंबाखूचे वारंवार सेवन करतात. परंतु ही तंबाखू आणि त्यातील निकोटीन आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. तंबाखूमध्ये निकोटीन व्यतिरिक्त टार आणि कासिनोजेन्स यांसारखे रसायने आढळतात. आणि या रसायदनामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढतात. आणि कर्करोगाचा धोका देखील निर्माण होतो. या रसायनांमुळे फुफुस, तोंड, घसा आणि इतर अवयवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तंबाखू खात असते, तेव्हा त्या व्यक्तीला तंबाखूची नाहीतर त्यात असलेल्यांनी निकोटिन लागत असते. त्यामुळे त्याला ते व्यसनच लागून जाते.
निकोटीन कोणत्या खाद्य पदार्थांमध्ये आढळते?
- टोमॅटो – टोमॅटोमध्ये नैसर्गिकरित्याने निकोटिन आढळते परंतु ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये असते.
- बटाटा – बटाटामध्ये देखील नैसर्गिक निकोटीन असते. परंतु त्याची मात्र देखील अगदीच कमी असते.
- वांगी – वांग्यांमध्ये देखील निकोटीन असते. परंतु ते आपल्या शरीराच्या दृष्टीने अगदी योग्य प्रमाणात असते.
- हिरवी मिरची – हिरव्या मिरच्यांमध्ये देखील निकोटीनचे प्रमाण अगदी कमी असते. या सगळ्या पदार्थांमध्ये निकोटीनचे प्रमाण अगदी कमी असते. त्यामुळे आपल्या आरोग्याला यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही.
निकोटीन म्हणजे काय? | What Is Nicotine ?
निकोटीन हे एक नैसर्गिक असे रसायन आहे. ते तंबाखू या वनस्पतीमध्ये आढळते. निकोटीन हा व्यसनाधीन करणारा एक पदार्थ आहे. म्हणजेच जर या निकोटीनचे सेवन कोणी केले, तर ते सातत्याने त्याचे व्यसन करू शकतात. या निकोटीनचा मध्यवर्ती मज्जा संस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक बद्दल होतात. निकोटिन अतिसेवनामुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. त्याचप्रमाणे लोकांचा मूड सुधारतो आणि त्यांना एकदम आरामदायी वाटते. त्यामुळे या गोष्टीचे व्यसन लागते. निकोटीन हे स्वतः कर्करोगास कारणीभूत नसतात. परंतु तंबाखूमध्ये इतर काही घटक असतात. ते घटक निकोटिन या रसायनाशी एकत्र झाल्यावर कर्करोगाचा गंभीर धोका निर्माण होतो.