निलेश माझिरे ‘या’ पक्षात प्रवेश करणार; पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे माझिरे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. निलेश माझिरे ठाकरे गटात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या, मात्र निलेश माझिरे शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

आज संध्याकाळीच निलेश माझिरे यांचा शिंदे गटात प्रवेश होईल. मुंबईत वर्षा बंगल्यावर त्यांचा पक्षप्रवेश होईल. त्यामुळे शिंदे गटाची ताकद पुण्यात वाढणार आहे. तर आधीच अडचणीत असलेल्या मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते, ते वसंत मोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, वसंत मोरे हे सुद्धा मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वसंत मोरे याना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर सुद्धा दिली होती. मात्र वसंत मोरे अजूनही मनसे आणि राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. मात्र त्यांचे समर्थक निलेश माझिरे शिंदे गटात गेल्याने पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.