राणेंची राजकारणातून निवृत्ती; दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मोठी घोषणा केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

निलेश राणे यांची पोस्ट

निलेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणले आहे की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, “आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे”

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1716709978227290112?t=RT5R0CfVFUt9cLeU3JxHjA&s=19

“मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो” अशी माहिती देत निलेश राणे यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.