हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Nilgiri Hills) जगभरात अनेक थक्क करणारी ठिकाणे आहेत. निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार पहायचे असतील तर निसर्गाच्या सानिध्यात जावं लागतं हेच खरं. आपल्या भारताला नैसर्गिक साधनसंपत्तीची अमाप प्रमाणात लाभली आहे. भारतात नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येतील अशी बरीच ठिकाणे आहेत. उंच उंच डोंगर, दऱ्या, धबधबे, नद्या पाहण्याची मजा काही औरच असते. अत्यंत सुखद आणि नेत्रदीपक दृश्यांमुळे अशा ठिकाणी मनाला अनोखी प्रेरणा मिळते. तुम्ही आजपर्यंत अनेक डोंगर, पर्वत रांगा असलेली स्थळं पाहिली असतील, फिरली असतील. पण तुम्ही कधी निळे पर्वत पाहिलेत का? होय. तुम्ही बरोबर वाचताय निळे पर्वत.
केरळ मधील मुन्नार हे ठिकाण सुंदर चहाचे मळे पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. (Nilgiri Hills) मात्र, त्याहून जास्त या ठिकाणी येणारे पर्यटक निळे पर्वत पाहण्यास उत्सुक असतात. अनोख्या सौंदर्याने नटलेल्या या निळ्या पर्वतांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जे केरळच्या सौंदर्यात विशेष भर टाकतात आणि मुख्य म्हणजे मुन्नार या ठिकाणाचे विशेषत्व वाढवतात. चला तर जाणून घेऊया निळ्या पर्वतांचे रहस्य.
निळ्या पर्वतांचे रहस्य तरी काय? (Nilgiri Hills)
केरळमधील मुन्नार या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा निळ्या पर्वतांचे दर्शन होते. सलग तीन पर्वत रांगांच्या संगमावर असलेले मुन्नार हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे १६०० मीटर उंचीवर आहे. या सुंदर ठिकाणी दरवर्षी निलकुरिंजी नावाचे निळ्या रंगाचे फुल उमलते. ही फुले दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक असतात. (Nilgiri Hills) ज्यामुळे पर्यटकांसाठी ही फुले आकर्षणबिंदु ठरतात. मुख्य म्हणजे प्रत्येक १२ वर्षांनंतर निलकुरिंजी फुले फुलतात आणि याच सुंदर निळ्या फुलांमुळे हे पर्वत निळ्या रंगाचे दिसतात. सर्वत्र फुललेली ही फुले या पर्वतांना निळ्या रंगाचे स्वरुप देतात आणि म्हणून हे पर्वत ‘नीलगीरी’ नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहेत.
शेवटचे कधी फुलले होते निलकुरिंजी ?
माहितीनुसार, २००६ साली या निलगिरी पर्वतांवर निलकुरिंजी फुलांचे दर्शन झाले होते. (Nilgiri Hills) यानंतर २०१८ साली ही फुले पुन्हा उमलली होती. यानंतर आता २०३० मध्ये निलकुरिंजी फुले पुन्हा फुलतील, असे म्हटले जात आहे.
कसे जाल?
जर तुम्ही मुन्नार फिरायला जायचा विचार करत असाल तर तुम्ही रोड, रेल्वे किंवा हवाई मार्गाने प्रवास करू शकता. तामिळनाडू येथील तेनी नावाचे रेलवे स्थानक या ठिकाणाहून सगळ्यात जवळ आहे. तर मदुराई विमानतळदेखील मुन्नारच्या जवळ आहे.(Nilgiri Hills)