माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही; निर्मला सीतारामन स्पष्टच बोलल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजप पक्षाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या 7 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अजून काही मतदारसंघांच्या याद्या या जाहीर होणे बाकी आहेत. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. माझ्याकडे पैसेच नसल्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत बोलताना सीतारामन म्हणाल्या की, ” मला भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारण्यात आले होते. मला तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवा, असे जेपी नड्डा यांनी सांगितले होते. यानंतर मी पक्षाने दिलेल्या प्रस्तावाबाबत 10 दिवस विचार केला. त्यानंतर 10 दिवसांनी मी निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षाला कळविले. यानंतर पक्षाने माझी विनंती मान्य केली”

लोकसभा निवडणूक लढविणार नाही..

पुढे त्यांनी सांगितले की, “एखादी निवडणूक लढविण्यासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. मी अर्थमंत्री असले तरी निधी हा देशाचा असतो, माझा नाही. माझ्यासाठी माझा पगार, माझी कमाई आणि बचत आहे. मी माध्यमांच्या आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. याबरोबर सभांच्या माध्यमांतून प्रचारात देखील सहभागी होणार आहे. परंतु मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही”

आता निर्मला सीतारामन यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात येत आहे. तसेच, “जो भाजप पक्ष जाहिरात येणार आपल्या उमेदवारांवर कोट्यावधी रुपये खर्च करतो त्याच पक्षातील अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसा कसा नाही?” असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांवर भाजपकडूनच काय उत्तर देण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.