युद्धजन्य स्थिती!! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सर्व बँकांना महत्वाचे निर्देश

Nirmala Sitaraman
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान विरुद्धच्या युद्धजन्य (India Pakistan War) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सर्व बँकांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. निर्मला सीतारामन यांनी सर्व बँकांना (Banks In India) कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सतर्क राहण्यास सांगितले जेणेकरून बँकिंग सेवा अखंडित राहतील. निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका तसेच विमा कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओंसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत, त्यांनी नेट बँकिंग, यूपीआय सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह बँकिंग क्षेत्राच्या ऑपरेशनल आणि सायबर सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. आणि बँकांना काही सूचना केल्या.

निर्मला सीतारमण यांनी सर्व डिजिटल आणि कोअर बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे फायरवॉलवर आहेत आणि २४ तास देखरेख ठेवली आहे याची खात्री करण्यास सांगितले. बँका आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्था मजबूत कराव्यात आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रोटोकॉलची चाचणी घ्यावी असं त्यांनी म्हंटल. तसेच डिजिटल बँकिंग सेवा सुरळीत राखण्याची गरजही निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली. सीमावर्ती भागातील शाखांमध्ये काम करणारे बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे निर्देशही अर्थमंत्र्यांनी बँकांना दिलेत.

हे पण वाचा : घुसखोरीचा फडशा ! भारताकडून पाकचे 4 एअरबेस आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पहा व्हिडीओ

अर्थमंत्र्यांनी बँकांना दोन२ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी सर्व सायबर-संबंधित बाबींवर अहवाल देईल आणि दुसरा अधिकारी बँक शाखांचे कामकाज, ATM मध्ये रोख रकमेची उपलब्धता यासह इतर कामकाजाच्या बाबी बघेल. दरम्यान, या बैठकीला बँका आणि विमा कंपन्यांव्यतिरिक्त, वित्तीय सेवा विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आणि राष्ट्रीय देयक महामंडळ (NPCI) यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.