Niroshan Dickwella Banned : क्रिकेटविश्वास मोठी खळबळ!! डोपिंग प्रकरणी कर्णधारच निलंबित

Niroshan Dickwella Banned
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella Banned) याला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मधून निलंबित करण्यात आलं आहे. डिकवेलाला लंका प्रीमियर लीग (LPL) दरम्यान डोपिंगविरोधी उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर निलंबित करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमिअर लीग दरम्यान ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत डिकवेला गॅले मार्व्हल्सचे कर्णधारपद भूषवत होता. थेट कर्णधारावरच निलंबनाची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीलंका क्रिकेटने एका निवेदनात म्हटले, निरोशन डिकवेला वरील निलंबन तात्काळ लागू झाले आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत कायम राहील. लंका प्रीमियर लीग 2024 दरम्यान श्रीलंका अँटी-डोपिंग एजन्सी (SLADA) द्वारे ही चाचणी खेळाची अखंडता राखण्यासाठी श्रीलंका क्रिकेटच्या चालू असलेल्या वचनबद्धतेचा भाग म्हणून घेण्यात आली.क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सी (WADA) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश क्रिकेट प्रतिबंधित पदार्थांच्या प्रभावापासून मुक्त राहण्याची खात्री करणे हा आहे. असं श्रीलंका क्रिकेट कडून सांगण्यात आलं.

यापूर्वी सुद्धा डिकवेला वादाच्या भोवऱ्यात- Niroshan Dickwella Banned

यापूर्वी सुद्धा निरोशन डिकवेला वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 2021 च्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये बायो-बबल उल्लंघनामुळे दानुष्का गुनाथिलका आणि कुसल मेंडिससह त्याच्यावर एक वर्षाची बंदी (Niroshan Dickwella Banned) घालण्यात आली होती. त्यानंतर तो बराच काळ श्रीलंका संघांच्या बाहेर होता. मार्च 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध डिकवेलाने आपली शेवटची कसोटी खेळली. त्याच्या एकूण कारकिर्दीबाबत सांगायचं झाल्यास,डिकवेलाने श्रीलंकेसाठी 54 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2757 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 1604 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये त्याने 480 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 शतके आहेत. नुकत्याच झालेल्या लंका प्रीमिअर लीग मध्ये त्याने 10 डावात 184 धावा केल्या होत्या. त्याचा संघ गॅले मार्व्हल्स अंतिम फेरीत पोचला होता मात्र फायनलमध्ये त्यांना जाफना किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.