रोहित शर्माला मिठी मारताच नीता अंबानींना अश्रू अनावर; Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कॉन्सर्टलाही क्रिकेटपटूंनी तसेच मनोरंजन आणि क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये भारताचा चॅम्पियन खेळाडू रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचाही समावेश होता. यावेळी रोहित शर्माला (Rohit Sharma) मिठी मारताना नीता अंबानी (Nita Ambani) या खूपच भावुक झाल्या, त्यांना अश्रू अनावर झाले. याबाबतचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नीता अंबानी यांनी रोहित शर्माला मंचावर बोलावलं. रोहित स्टेजवर येताच नीता अंबानींनी त्याला मिठी मारली. यावेळी नीता अंबानी भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. आज रात्री मुंबई इंडियन्सचे कुटुंब माझ्यासोबत असणं किती छान वाटतं हे मी सांगू शकत नाही. या मुंबई इंडियन्सच्या परिवाराचा देशाला अभिमान आहे, यांच्यामुळे सर्वांचे हृदय अभिमानाने भरले आहे असं म्हणत नीता अंबानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, या देशात विश्वचषक आणणे आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. हे त्या लोकांसाठी आहे जे खेळाचे समर्थन करतात आणि तो पाहतात आणि आपल्या सर्वांसोबतच, गेल्या 11 वर्षांपासून, त्यांना सुद्धा ही ट्रॉफी भारतात आणायची होती, शेवटी आपण ती आणलीच याचा मला खूप आनंद वाटत आहे.

दरम्यान, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचं खास कनेक्शन आहे. 2013 साली रोहित शर्माकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडियन्सने तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र 2024 म्हणजेच यंदाच्या वर्षी रोहित शर्माची कर्णधारपदाची जबाबदारी काढली आणि मुंबईने हार्दिक पंड्याच्या खांद्यांवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. या निर्णयानंतर रोहितच्या चाहत्यांनी फ्रेंचायजीवर सडकून टीकाही केली होती.