संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी राणेंनी थेट ‘या’ नेत्याचं नाव घेतलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. स्टॅम्प आणि रॉडने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सत्ताधारी नेते आक्रमक झालं असून याचे पडसाद आज सभागृहात सुद्धा पहायला मिळालं. यावेळी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट ठाकरे गटाचे नेते वरून सरदेसाई (Varun Sardesai) यांचं नाव घेतलं. या हल्ल्यामागे वरुण सरदेसाई त्यांचा तर काही संबध आहे का ? याची चौकशी व्हावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

सभागृहात बोलताना नितेश राणे म्हणाले, संदीप देशपांडे यांचा मनसुख हिरेन, सुशांतसिंह राजपूत करण्याचा प्रयत्न आज झाला आहे. हल्लेखोरांनी हल्ला करताना काही लोकांची नाव सुद्धा घेतली असून पोलीस तपासात ते बाहेर येतील. पण गेल्या काही महिन्यांपासून हे संदीप देशपांडे वरुण सरदेसाई या व्यक्तीबाबत सातत्याने आरोप करत आहेत. मागील सरकारमध्ये या वरुण सरदेसाई यांची काय ताकद होती हे आपल्या सर्वाना माहित आहे. संदीप देशपांडे सारखा एक कार्यकर्ता मुंबई महापालिकेबाबतचे विषय मांडत असताना त्याच्यावर हल्ला होतो. मग या वरूण सरदेसाई आणि संबंधित लोकांचा यामध्ये काय हस्तक्षेप आहे का याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यांनंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असेल. याप्रकरणी चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा अशी आक्रमक मागणी अमेय खोपकर यांनी केली.