दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंची चौकशी होणार; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये आता भाजप पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी करण्यात येणार आहे. नितेश राणे यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. कारण की, दिशा सालियनने आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे असा दावा राणे यांनी केला होता. यावरूनच आता त्यांची चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नितेश राणे यांनी म्हटले होते की, दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, त्यासंबंधी पुरावे देखील माझ्याकडे आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानंतरच मुंबई पोलिसांनी निलेश राणे यांच्या चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या चौकशीत नितेश राणे कोणते पुरावे पोलिसांना देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नितेश राणे याचा दावा

दरम्यान, “दिशा सालियान प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत. त्या हिंदू मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाला. याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, सीसीटिव्ही फुटेज, रजिस्टरचे कागद फाडण्यात आले. मी पोलिसांना सगळी माहिती देण्यासाठी तयार आहे. मी मुंबई पोलीस आणि SIT समोर सगळे पुरावे देणार आहे” असा दावा स्वतः नितेश राणे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर या प्रकारणाला नविन फाटे फुटले आहेत.