nitin gadkari : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार; गडकरींनी दिली नव्या योजनेची माहिती

nitin gadakri
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

nitin gadkari : रस्ते अपघातात जखमी आणि प्राण गमावलेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत आणि कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी सरकारनं काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. मंगळवारी दिल्ली इथे नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

मोफत कॅशलेस उपचार सुविधा

केंद्र सरकारने रस्ते अपघातातील पीडितांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने जखमी झालेल्या व्यक्तींसाठी नवी योजना सुरू केली आहे या योजनेला ‘कॅशलेस उपचार’ असं नामकरण करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांच्या सात दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना ही माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी दिली आहे.

या कॅशलेस सुविधा बाबत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितलं की, काही राज्यांमध्ये कॅशलेस उपचार हा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला होता आणि आता त्यातल्या सर्व त्रुटी दूर करून त्याची पुन्हा अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा फायदा अपघातातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहेत असं त्यांनी सांगितलं.

हिट अँड रन प्रकरणातील पीडितांनाही दिलासा (nitin gadkari)

एवढेच नाही तर यासोबत हिट अँड रन प्रकरणातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये पर्यंतची भरपाई सुद्धा मिळणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. तसेच 2024 मध्ये रस्ते अपघातात जवळपास 1.80 लाख लोकांनी आपला जीव गमावल्याची चिंताजनक आकडेवारी सांगत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य रस्ते सुरक्षा असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय 30,000 लोकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाला. 66% अपघातात हे 18 ते 34 वयोगटातील नागरिकांचे झाले आहेत असेही नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या या योजनेमुळे रस्ते अपघातातील जखमींना आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.