भाषण करताना नितीन गडकरींना आली भोवळ; भरसभेत उडाला गोंधळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज यवतमाळ येथील पुसदमध्ये घेण्यात आलेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भोवळ आल्याची घटना घडली. या सभेत भाषण करताना अचानक नितीन गडकरी यांना भोवळ आली. यामुळे त्यांचा तोल जाणारच होता की तितक्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी त्यांना सावरले. पुढे ताबडतोब गडकरी यांना स्टेजवरून खाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी नितीन गडकरी आज यवतमाळच्या पुसद येथे सभेसाठी आले होते. या सभेमध्ये नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असताना त्यांना भोवळ आली. यावेळी जवळ असलेल्या लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले. घडलेल्या या प्रकारामुळे सभेमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु थोड्या वेळानंतर पुन्हा नितीन गडकरी यांनी स्टेजवर येऊन जनतेशी संवाद साधला.

दरम्यान, सध्या विदर्भामध्ये उन्हाचा पारा 42 डिग्री सेल्सिअसच्या वर गेला आहे. याच उष्णतेमुळे नितीन गडकरी यांना देखील भोवळ आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर आता नितीन गडकरी यांच्या तब्येत सुधारणा झाली असल्याचेही सांगितले जात आहे. महत्वाचे म्हणजे, आज राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसद येथील शिवाजी ग्राऊंडवर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती.