.. तेव्हा गडकरींना आली होती काँग्रेसची ऑफर; स्वतःच केला गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नितीन गडकरी देशभरातील राजकीय विषयांवर बेधडकपणे आपलं मत मांडताना आपण अनेकदा पाहिलं असेल. आता तर त्यांनी एकेकाळी आपल्याला काँग्रेस प्रवेशाची ऑफर आली होती असं म्हणत त्यासंदर्भातील एक किस्साही सांगितला आहे.

नागपूर येथील एका आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. हारलो तरी एकवेळ माणूस संपत नाही, पण जेव्हा तो प्रयत्न करायचं सोडून देतो तेव्हा मात्र तो संपतो असेही गडकरी म्हणाले.

कोणताही व्यवसाय असो, सामाजिक कार्य असो किंवा राजकारण असो त्याच्यासाठी माणसांचा संपर्क हीच सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे कोणीही ‘वापरा आणि फेक’ या फंद्यात पडू नये.” चांगले दिवस असोत की वाईट दिवस, एकदा का कोणाचा हात धरला की तो हात कधी सोडू नका. उगवत्या सूर्याची पूजा करू नका असा कानमंत्रही गडकरी यांनी दिला.