पुल कोसळण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी गडकरींचा मेगाप्लॅन तयार; काही क्षणात मिळणार माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पूल कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. दुर्घटना घडल्यानंतर त्याची माहिती प्रशासनास मिळते. मात्र, अशा दुर्घटना घडण्यापूर्वी तसेच घडल्यास त्याची थेट दिल्लीत माहिती मिळणार आहे. अशाच एक मेगाप्लॅन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे. त्यांनी नुकतीच या मेगाप्लॅनविषयी माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मोरबी येथील पूल कोसळल्याची सर्वात दुःखदायक घटना घडली. या घटनेत तब्बल 135 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशातील कमकुवत असणाऱ्या पुलांची दुरुस्ती आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याबाबात एका कार्यक्रमात मंत्री गडकरींनी पूल दुर्घटना घडल्यास त्याची तत्काळ माहिती मिळण्यासाठी मेगा प्लॅन तयार केला असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, देशात कुठेही एखादा पूल कोसळणार असेल तर त्याची अगोदरच पूर्वमाहिती मिळावी अशी यंत्रणा तयार केली जात आहे.

मी ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतील अशा पुलाच्या दुर्घटना घडण्यापूर्वी तसेच घडल्यास तत्काळ माहिती कशी मिळते या यंत्रणांचा अभ्यास केला. अशा यंत्रणेबाबत आपल्या देशात, नाशिकमध्येही आपल्या काही शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. देशातील सर्वच पूल एका सिस्टिमद्वारे जोडले जातील. ही यंत्रणा दिल्लीतील एका कंप्यूटरला जोडली जाईल. जेणेकरून एखाद्या पुलात बिघाड झाला असेल तर त्याची सूचना दिल्लीतल्या कंप्यूटरला आधीच मिळेल, अशी यंत्रणा आम्ही तयार करत आहोत.

आतापर्यंत आम्ही 80 हजार पूलांचा रेकॉर्ड गोळा केला आहे. अजून 3 ते 4 लाख पूलांचा रेकॉर्ड घ्यायचा बाकी आहे. आम्ही तयार केल्या मेगा प्लॅनमध्ये एखाद्या पूलात काही बिघाड झाला तर तत्काळ अलार्म वाजेल. कंप्यूटरद्वारे राज्य सरकार आणि स्थानिक नगरपरिषदांना माहिती दिली जाई, अशी माहिती मंत्री गडकरींनी दिली.