मोदी सरकार कोसळणार, चंद्राबाबू- नितीशकुमार साथ सोडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर नितीशकुमार आणि चंद्राबाबूं नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ सोडतील आणि केंद्रातील सरकार देखील पडेल असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मोदींची खुर्ची डळमळीत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्रातील मोदींचं सरकार हे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पर्टीच्या पाठिंब्यावर उभं आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार हे दोघेही भाजपाला सोडून जातील. मोदींची खुर्ची डळमळीत असून वाजपेयींच्या १३ महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती होईल . अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार १३ महिन्यांत कोसळलं होतं. त्याचप्रमाणे मोदींचं सरकारही कोसळेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असा दावा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. बदलापुरात झालेली घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे असं चव्हाणांनी म्हंटल. काहीही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपा महायुती सरकारला घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.