हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | NLC Recruitment 2024 | अनेक लोकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात. जर तुमची देखील अशीच इच्छा असेल, तर तुम्हाला लवकरच सरकारी नोकरी लागणार आहे. कारण आता एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC Recruitment 2024) ही कंपनी केंद्र सरकारची एक नवरत्न कंपनी आहे. आत्ता या कंपनीमध्ये तुम्हाला सरकारी नोकरी लागू शकते. NLC इंडिया लिमिटेच्या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केलेली आहे. 24 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही 24 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या पदासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
कोणत्या पदासाठी किती जागा?
- औद्योगिक कामगार – 9
- लिपीक सहायक – 17
- ज्युनियर इंजिनीयर पदांसाठी – 8
शैक्षणिक पात्रता
- जूनियर इंजीनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इंजीनियरिंग किंवा डिप्लोमा या विषयात विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे.
- औद्योगिक कामगार – या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे कोणत्याही संस्थेतून प्रदान करण्यात आलेली इंजीनियरिंगची किंवा डिप्लोमाची पदवी असणे गरजेचे आहे.
- लिपिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बारावी पास तसेच आयआयटी पास असणे गरजेचे आहे.
अर्ज फी | NLC Recruitment 2024
- ज्युनिअर इंजिनियर ईडब्ल्यूएस, ओबीसी, जनरल या पदांसाठी 595 रुपये फी आहे, तर एससी, एसटी पीडब्ल्यूडी, माजी सैनिक इत्यादी उमेदवारांसाठी 295 रुपये अर्ज फी आहे.
- लिपिक सहाय्यक आणि औद्योगिक कामगार इडब्ल्यूएस,ओबीसी आणि ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना 486 रुपये फी आहे तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी माजी सैनिक या उमेदवारांना 236 रुपये अर्ज फी आहे.
अर्ज कसा करावा ?
- यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.
- त्यानंतर करियर या बटनावर क्लिक करा.
- नंतर तालाबिरा प्रकल्पासाठी फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट (FTE)या अर्ज (Apply) लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी आवश्यक माहिती भरून घ्या.
- त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- त्यानंतर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून संपूर्ण अर्ज भरा.
- नंतर अर्ज सबमिट केल्यानंतर एक युनिक क्रमांक तयार केला जाईल.
- त्यानंतर आवश्यक भरून घ्या आणि अर्ज सबमिट करा.