नोबेलनगरी | २०१८ साली देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांच्या घोषणेला आज सुरुवात झाली असून यंदाचा वैद्यकशास्त्रातील पुरस्कार कॅन्सरवरील पेशींच्या संशोधनासाठी काम करणाऱ्या अमेरिकेच्या जेम्स ऍलिसन आणि जपानच्या टुसुको होंजो यांना जाहीर झाला आहे. इम्युनची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅन्सरच्या पेशींविरुद्ध लढण्यासाठीचं महत्वपूर्ण संशोधन या दोघांनी केलं आहे. कॅन्सरविरोधातील लढाईत हे संशोधन खूप मोलाचं ठरल्याचं मत नोबेल समितीने व्यक्त केलं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता आणि अर्थशास्त्रातील नोबेल अनुक्रमे २,३,५ व ८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील. साहित्यातील नोबेल पारितोषिक यंदा दिले जाणार नाही.