Nokia 220 4G आणि Nokia 235 4G मोबाईल लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । HMD ने नोकिया ब्रँडचे २ नवे मोबाईल भारतीय बाजारात लाँच केले आहेत. Nokia 220 4G आणि Nokia 235 4G असे या दोन्ही मोबाईलचे नाव असून हे बटणाचे म्हणजेच कीपॅड मोबाईल आहेत. कंपनीने अलीकडेच नोकिया 3210 (2024) भारतात लॉन्च केला होता. त्यानंतर आता आणखी २ नवीन मोबाईल भारतीय बाजारात आणले आहेत. या दोन्ही मोबाईलच्या UPI पेमेंट सुद्धा करू शकता हि या मोबाईलची खास गोष्ट आहे. आज आपण नोकियाच्या या दोन्ही मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नोकियाच्या या फोनमध्ये 2.8 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. यामध्ये Unisoc T107 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन 64MB रॅम आणि 128MB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यामध्ये 32GB चे मायक्रोएसडी कार्ड इन्स्टॉल केले जाऊ शकते. Nokia 235 4G फीचर फोन Nokia S30+ OS वर काम करतो. मोबाईल मध्ये स्कॅन आणि पे UPI हे अँप आधीपासूनच इंस्टाल केलेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी बिन्दास्तपणे एकमेकांना ऑनलाईन पैसे पाठवू शकता. नोकियाच्या या मोबाईल मध्ये पॉवर साठी कंपनीने 1450mAh बॅटरी बसवली असून अगदी 9.8 तास ती आरामात चालते. यात ३.५ मिमी हेडफोन जॅक, एमपी३ प्लेयर आणि एफएम रेडिओ यांसारखी फीचर्स मिळतात.

किंमत किती ?

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर Nokia 235 4G (2024) ची किंमत 3,749 रुपये आहे. हा फोन निळा, काळा आणि जांभळ्या रंगात येतो. तर दुसरीकडे Nokia 220 4G (2024) ची किंमत 3249 रुपये आहे. हा फोन पीच आणि काळ्या रंगात येतो. ग्राहक हे दोन्ही मोबाईल HMD.com, Amazon.in आणि इतर आउटलेटवरून खरेदी करु शकतात.