Nokia 3210 4G मोबाईल भारतात लाँच; UPI सह मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 3210 4G launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने भारतीय बाजारात एक नवा कीपॅड मोबाईल लाँच केला आहे. Nokia 3210 4G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये UPI पेमेंट आणि युट्युबसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या मोबाईलची किंमत अवघी 3,999 रुपये ठेवली असून ग्राहक प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India आणि HMD eStore वरून हा मोबाईल खरेदी करू शकतात. आज आपण या मोबाईलची खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

Nokia 3210 4G या मोबाईलचे वजन अवघे 62 ग्रॅम आहे. मोबाईलमध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये UniSoC T107 प्रोसेसर बसवण्यात आला असून नोकियाचा हा मोबाईल S30+ सॉफ्टवेअरवर काम करतो. मोबाईलच्या पाठीमागील पॅनलवर 4G सपोर्ट आणि कॅमेरा सेन्सर देखील आहे. कंपनीने यामध्ये 2MP चा रियर कॅमेरा दिला आहे, जो LED फ्लॅश लाइटसह येतो. यात 64MB रॅम आणि 128MB नेटिव्ह स्टोरेज आहे. तुम्ही हे स्टोरेज वाढवण्यासाठी यूजर्स मायक्रोएसडी कार्डची मदत घेऊ शकतात. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 32 GB पर्यंत वाढवता येते

UPI YouTube चा सपोर्ट – Nokia 3210 4G

खास बाब म्हणजे Nokia 3210 4G क्लाउड ॲप्ससह येतो ज्यात YouTube, YouTube Shorts, बातम्या आणि बऱ्याच फीचर्सचा समावेश आहे. मोबाईल मध्ये इनबिल्ट UPI वैशिष्ट्य देखील आहे ज्यामुळे तुम्ही स्कॅन करून ऑनलाईन पैसे पाठवू शकता. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये USB-C पोर्ट, ड्युअल-सिम, 4G, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स मिळतात. नोकियाचा हा बटणाचा मोबाईल निळ्या, काळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध आहे.