Nokia G42 5G : Nokia ने भारतात लाँच केला नवा 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nokia G42 5G : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने आपला Nokia G42 5G मोबाईल 4GB RAM व्हेरिएन्ट मध्ये नव्याने लाँच केला आहे. खरं तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात लॉन्च झाला होता, मात्र आता नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये पुन्हा एकदा ग्राहकांसाठी बाजारात आणण्यात आला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

6.56-इंचाचा डिस्प्ले-

Nokia G42 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशन सह येत असून याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण देण्यात आले आहे. स्मार्टफोनला ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट बसवण्यात आली आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 4GB RAM सह 2GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आणि 128GB ऑनबोर्ड मेमरी दिली आहे.

कॅमेरा – Nokia G42 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Nokia G42 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती ?

Nokia G42 5G च्या नवीन 4GB रॅम वेरिएंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या ८ मार्चपासून प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट Amazon वर आणि HMD वर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही हा स्मार्टफोन ग्रे, पर्पल आणि गुलाबी रंगात खरेदी करू शकता.