UPI Transactions: आता UPI ट्रांझेक्शनसाठी आकारले जाणार पैसे; ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बाजारामध्ये पेटीएम, फोन पे, गुगल पे अशी अनेक ऑनलाईन पेमेंट ॲप्स आल्यामुळे व्यवहार करण्याच्या पद्धती सोप्या झाल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला फिनटेक कंपन्या महसूलाबाबत चिंतेत पडल्या आहेत. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी लवकरच UPI ट्रांझेक्शनसाठी (UPI Transactions) पैसे आकारले जाऊ शकतात. असे झाल्यास ऑनलाईन पेमेंट ॲप वापरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये देखील घट होऊ शकते. यामुळेच असा निर्णय घेण्याबाबत कंपन्यांकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.

खरे तर, रिझर्व बँक ऑफ इंडियाने पेटीएमवर कारवाई केली असताना देखील पेटीएम वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. आतापर्यंत कोणतेही ऑनलाइन पेमेंट ॲप आपल्या वापरकर्त्यांकडून शुल्क आकारात नव्हते. परंतु आता इतर कंपन्या आपल्या वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्याचा विचार करत आहेत. असा निर्णय घेण्याबाबत कंपन्यांकडून तयारी सुरू आहे. मुख्य म्हणजे, तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक हे सर्वजण स्मार्टफोनवरून पेमेंट करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत.

गुगल पे फोन पे असे आपल्यामुळे या लोकांची सतत पैसे वागवण्याची चिंता दूर झाली आहे. आता कोणत्याही भागात गेले तरी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करता येऊ शकते. याचा सर्वाधिक फायदा कंपन्यांना होताना दिसत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला याच ऑनलाईन पेमेंटचे काही तोटे देखील जाणवण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्या यूपीआय ट्रांजेक्शनवर (UPI Transactions) शुल्क लागू करण्याचा विचार करत आहे. या सर्व कंपन्यांचे एक मत झाल्यानंतर याबाबत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, एकट्या फेब्रुवारी महिन्यात यूपीआय ट्रांजेक्शनच्या माध्यमातून 122 कोटी व्यवहार झाले आहेत. ज्याची किंमत 18.2 लाख कोटी रुपये आहे. मात्र, हा आकडा जानेवारीत झालेल्या व्यवहारांपेक्षा कमी आहे. जानेवारी 2024 मध्ये UPI व्यवहारांची संख्या 121 कोटी होती. ज्यामध्ये 18.4 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. म्हणजेच दिवसेंदिवस यूपीआय ट्रांजेक्शनने (UPI Transactions) पेमेंट करण्याची संख्या वाढत चालली असल्याचे दिसत आहे.