आता CRPF परीक्षा मराठीतून होणार; गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

CRPF Exam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या लष्कराबरोबरच केंद्रीय दलातील भरतीकडेही तरुणांचा कल वाढत चालला आहे. परंतु हे तरूण इंग्रजी आणि हिंदी भाषेत द्याव्या लागणाऱ्या लेखी परीक्षेत मागे पडताना दिसत आहेत. परिणामी त्यांचे केंद्रीय दलाल नोकरी करण्याचे स्वप्न अर्धवट राहत आहे. याचीच दखल घेत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता CRPF परीक्षा (CRPF Exam) स्थानिक भाषांमध्येही देता येणार आहे. यामुळे CRPF परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे

सध्याच्या घडीला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CRPF) कॉन्स्टेबल दलांतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा इंग्रजी, हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार आहे. यामध्ये मराठी भाषेचा ही समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CRPF कॉन्स्टेबल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जाणार आहेत. त्यामुळे मराठी असणाऱ्या उमेदवारांना मराठीच भाषेत पेपर लिहण्याची मुभा मिळणार आहे.

दरम्यान, कॉन्स्टेबल जीडी परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार बसतात. त्यामुळे या परीक्षेसंदर्भात गृहमंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने एक सामंजस्य करार केला आहे. या करारात हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, उमेदवारांना मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या भाषेत परीक्षा देता येणार आहे.