Tuesday, March 21, 2023

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे केवळ राज्यातील महत्वाचे नेते नसून संपूर्ण देशात राजकीय क्षेत्रात त्यांचे वजन आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आता माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या भेटीबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांनी आज सकाळी शरद पवार यांचे मुबई येथील निवास्थान सिल्वर ओक येथे जाऊन भेट घेतली याबाबत एकनाथ खडसे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ही सदिच्छा भेट होती, शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होते, असे खडसे यांनी सांगितलं. तसंच, यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत हे सुद्धा उपस्थितीत होते. अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली पवारांची भेट

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आले होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर गेले होते.मुक्ताईनगरमध्ये जाऊन त्यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर आज सकाळी एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.