खूशखबर!! आता पंखा, AC अन् मोटारीचे लाईटबिल येणार झिरो; सरकारी योजना जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विजेच्या बिलाचा दर सतत चांगलाच वाढलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाचा महिन्याचा खर्च बिघडल्याच दिसतं. तूम्ही देखील या वीज बिलामुळे परेशान असाल तर तुमच्यासाठी एक खास योजना सरकारने आणलेली आहे. त्यामुळे आता तूम्ही हवा तेवढा वेळ टीव्ही एसी आणि कितीही वीज वापरू शकता. परंतु तरीही तुमचं बिल हे शून्यच येईल. असं कस काय होऊ शकतं असा प्रश्न तुम्हाला देखिल पडला असेल. पण चिंता करू नका,
सरकारने सौर पॅनेलशी संबंधित एक योजना सुरू केलेली आहे. ज्यामुळे लाईट बिल बघून खिशाला हाथ जाणार नाही. आणि बिल देखिल वाढणार नाही.

वीज बिलामध्ये बचत मिळण्यासाठी सरकारने आता सोलर पॅनल योजना सुरू केली आहे. तुम्ही आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनेल बसवू शकता. यासाठी सरकारनं सूटही दिली आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. फक्त एकदा सोलर पॅनल बसवले की 25 वर्षांपर्यंत विजेचा लाभ मिळू शकतो. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खर्चाचे पेमेंट 3 ते 4 वर्षांत पूर्ण होईल. तुम्हाला याचा मोठा फायदा आरामात मिळू शकतो. आणि 20 ते 25 वर्षे तूम्ही भरपूर आनंद घेऊ शकतात.

परंतु सोलर पॅनल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 100 चौरस फूट जागा आवश्यक आहे. याचबरोबर, केंद्र सरकारकडून तुम्हाला 3 किलो वॅटपर्यंतच्या सौरऊर्जेवर 40 टक्के सूट दिली जात आहे. 3 kW नंतर 10 kW पर्यंत 20 टक्के अनुदान दिले जात आहे. याचबरोबर, 10 kW प्रति कुटुंब आणि 500 kW पर्यंत 20 टक्के सूट देण्याचे काम देखील केले जात आहे. यासाठी तुम्ही कंपनीची वेबसाइट portal.mpcz.in मुख्य पेजवर ओपन करून पाहू शकतात. येथे भेट देऊन, तुम्ही आरामात अर्ज करू शकता