आता फ्री मध्ये मिळतेय इलेक्ट्रिक स्कुटर; पहा कुठे आहे ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीचा हंगाम सुरू होताच वाहन निर्मात्यांनी त्यांच्या ग्राहकांना एकापेक्षा एक उत्तम ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी हिरो इलेक्ट्रिकनेही ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर अंतर्गत आता इलेक्ट्रिक स्कूटर मोफत जिंकण्याची संधी मिळू शकते. कंपनीने याला ओणम ऑफर असे नाव दिले आहे. ही ऑफर प्रसिद्ध ओणम सण लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे.

ओणम हा केरळमधील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. म्हणूनच, गाड्यांच्या विक्रीला चालना देण्यासाठी या शुभ प्रसंगी, Hero Electric ने केरळमधील प्रत्येक 100व्या ग्राहकाला एक मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देण्याची घोषणा केली आहे. तथापि, विजेत्याची निवड कंपनीच्या नियमांच्या आधारे केली जाईल. कंपनीने खुलासा केला आहे की ही ऑफर ओणम सणाच्या संपूर्ण कालावधीत लागू आहे. ग्राहकांना ई-स्कूटरवर पाच वर्षांची वॉरंटी मिळेल ज्यामध्ये दोन वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील समाविष्ट आहे. Hero Electric ने नुकतेच मलप्पुरम, केरळ येथे भारतभरात 1000 टचपॉइंट्स पूर्ण करून सर्वात मोठ्या डीलरशिपचे उद्घाटन केले आहे. याशिवाय, कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी सुलभ करण्यासाठी अनेक बँकांशी भागीदारी केली आहे, जेणेकरून सुलभ वित्तपुरवठा करता येईल.

या ऑफरबद्दल बोलताना हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले, “देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ग्रीन मोबिलिटीचा अंगीकार करण्यासाठी मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचे उत्सव ही सर्वोत्तम वेळ आहे, असा आमचा विश्वास आहे. ओणम हे केरळमध्ये दीर्घ उत्सवाची सुरुवात करते, जे ग्राहकांच्या भावनांमध्ये एकूण सकारात्मकता दर्शविते आणि आम्ही सण आणखी चांगला करण्यासाठी या खास ऑफर घेऊन आलो आहोत.”

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकून हिरो इलेक्ट्रिकने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 10,476 मोटारींची विक्री केली आहे. हिरो इलेक्ट्रिक ही जुलै 2022 मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी होती. दुसरीकडे, ओकिनावा दुसऱ्या क्रमांकावर आणि एथर इलेक्ट्रिक तिसऱ्या क्रमांकावर होती.