हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे ही प्रवासाचे एक उत्तम साधन आहे . खास करून जेव्हा आपल्याला कोणत्या लांबच्या प्रवासाला जायचे असते तेव्हा आपण रेल्वेच्या प्रवासालाच पसंती दर्शवतो, कारण लांबच्या ठिकाणी जाताना ट्रेनचा प्रवास करणं सोयीस्कर ठरत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासाचा खर्च सुद्धा वाचण्यास मदत होते. परंतु कधी कधी ट्रेन उशिरा आल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होतो. अशा परिस्थितीत रेल्वेची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे अगदी मोफत मध्ये जेवणाची सोया करतेय. बऱ्याचवेळा काही कारणामुळे रेल्वेला प्लॅटफॉर्म वर यायला बराच उशीर होतो, त्यावेळी या गाड्यांची वाट बघत अनेक प्रवासी थांबलेले असतात. भारतीय तरतुदीप्रमाणे या थांबलेल्या प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते.
कधी कधी असं होतं की गाडी ऑन टाइम पोहचत नाही . किंवा गाडीला यायला काही कारणात्सव उशीर होतो. जर तुम्ही शताब्दी, राजधानी किंवा दुरांतोने प्रवास करत असाल आणि त्यापैकी कोणत्याही ट्रेनला उशीर होत असेल तर तुम्ही या विशेष सेवेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे या ट्रेनला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास भारतीय रेल्वे मोफत जेवण पुरवते. ट्रेन मध्ये हे जेवण आपल्या जेवणाच्या वेळी म्हणजे दुपारी आणि रात्री जेवण बनवले जाते. फक्त जेवणच नाही तर तुम्हाला चहा, कॉफी आणि बिस्किटे हे अल्पोपहार देखील फ्री मध्ये दिला जातो.
IRCTC नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण मिळण्याचा हक्क आहे. जर तुमची ट्रेन दोन तासांपेक्षा जास्त उशिरा असेल तर तुम्हाला ही सुविधा दिली जाते. फक्त एक्स्प्रेस ट्रेनचे प्रवासी ही सेवा वापरू शकतात. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एक्स्प्रेस ट्रेनचे प्रवासीच या मोफत जेवणाचा लाभ घेऊ शकतात.