औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संगीत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विषयास दोन प्राध्यापकांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आली आहे. प्राध्यापकांची नियुक्ती न केल्यास येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशात मान्यता न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यासंदर्भात विद्यापरिषद व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला असून परिपत्रक जाहीर केले आहे.
या परिपत्रकाद्वारे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष 2021 -22 पासून महाविद्यालयात मान्यताप्राप्त पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या निवड समितीमार्फत विहित केलेल्या केलेल्या प्रक्रियेने आणि आरक्षणासह 2 अहर्ता धारक पद्युत्तर अध्यापक नियुक्त करणे आवश्यक आहे. या प्रकरणी संलग्नित महाविद्यालयांनी विहित केलेल्या प्रक्रियेने दोन नियमित पदव्युत्तर अध्यापकांची नियुक्ती करून विद्यापीठाची अध्यापक मान्यता घेणार नाही. अशा महाविद्यालयांची नावे नो अॅडमिशन गटात समाविष्ट करून सर्व संबंधित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. याबाबत प्रतिबंधित करण्यात येईल याची कृपया नोंद घेण्यात यावी असे परिपत्रकात नमूद केले आहे.
अनुदानित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नियुक्त करावयाचे अध्यापकांची रिक्त पदे शासनाने मंजूर केलेल्या कार्यभार यानुसार भरावीत तसेच कायम विना अनुदानित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधित महाविद्यालयांना रिक्त पदे भरण्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता नसल्यामुळे विद्यापीठाच्या आरक्षण विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी घेऊन पदव्युत्तर अध्यापकांची रिक्तपदे भरण्याबाबत तत्काळ कारवाई करून तसा अहवाल विद्यापीठात सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.