आता Facebook आणि Instagram वरून करा शॉपिंग; लवकरच येतंय खास फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅफॉर्मवर तुम्हाला आलेली जाहिरात आणि त्यात दाखवलेली वस्तु अमेझॉन (Amazon) वर न जाता तिथेच खरेदी करता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे कस शक्य आहे. तर अमेझॉनने एक नवीन फिचर आणले आहे. ज्यामुळे फेसबुक आणि इन्स्टावर शॉपिंग करता येणार आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात.

कसे आहे हे फिचर ?

एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात सोशल मीडियावर पहिली की ती घेण्यासाठी आपल्याला अमेझॉनसारख्या प्लॅफॉर्म वर जाऊन टी वस्तू सर्च करावी लागते. मात्र आता तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पाहिलेले प्रॉडक्ट तुम्हाला त्याच ऍप वर खरेदी करता येणार आहे. सध्या अमेझॉन आणि मेटा या दोन कंपन्या मिळवून या फिचरवर काम करत आहेत. यानुसार तुम्हाला सोशल मीडिया वर शॉपिंग करता  येणार आहे. त्यासाठी हे फिचर लाँच झाल्यानंतर तुमचे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर अकाउंट अमेझॉनला लिंक करायचे आहे. त्यानुसार तुम्हाला शॉपिंग करता येणार आहे.

कशी कराल शॉपिंग ?

ज्याप्रमाणे तुम्ही अमेझॉनवर शॉपिंग करता अगदी तशीच सोपी पद्धत येथे वारायची आहे. तुम्हांला या नवीन फिचरमुळे वस्तूची किंमत, डिलिव्हरी चार्जेस, ऍड्रेस, प्राईम ऑफर्स, डिलिव्हरी टाईम आणि इतर डीटेल्स दिसतील. तसेच तिथूनच ऑर्डर प्लेस करून ती ट्रॅक करण्याचा पर्यायही यूजर्सकडे असणार आहे. ही सुविधा सुरुवातीला केवळ ठराविक प्रॉडक्ट्सवर असेल असं अमेझॉनने स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेत लाँच होईल हे फिचर

या फिचरची चर्चा सध्या चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे याचे पहिले लाँचिंग हे अमेरिकेत होणार आहे. अमेरिकेत सोशल मेडियाचा वापर हा तेवढाच अधिक आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर एवढा वाढला आहे की, संपूर्ण जगभरात त्याचे वापरकर्ते 4.95 अब्ज एवढे आहेत. जे की एकूण जागतिक लोकसंख्येच्या 61.4 टक्के इतके आहे. त्यामुळे कोणालाही आपला ब्रँड जगासमोर आणायचा असेल तर तो व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतो. भारतात याचे प्रमाण 398.0 मिलियन असून 51 टक्के तरुण वर्ग सोशल मीडियाचा वापर करतात. यामुळे या नवीन फिचरला चांगलाच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.