आता फक्त 5 रुपयात मिळणार जेवणाची थाळी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही महिन्यांमध्येच विधानसभा निवडणुकीकांचे बिगुल वाजू शकते. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून देखील अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजच्या वापरातील सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यांतील प्रत्येक एका व्यक्तीला फक्त ५ रुपयात जेवणाची थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवराज चौहान यांच्याकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी, राज्यातील कोणत्याच व्यक्तीला उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये यासाठी जेवणाची थाळी फक्त पाच रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे. या जेवणाची दीनदयाल किचनमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी 66 दीनदयाल किचन सुरु करण्यात येतील. या किचनमध्ये राज्यातील गरजू महिलांना काम दिले जाईल ज्यामुळे त्यांना देखील रोजगार मिळेल. तसेच गरजूंना रोज जेवण उपलब्ध होईल.

नुकतेच भोपाळमधील कुशाभाउ ठाकरे येथील एका हॉल मध्ये शिवराज चौहान यांनी नदयाल किचन योजनेमधील तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. यावेळी बोलत असताना त्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. आता जे जेवण गोरगरिबांना देण्यात येत आहे ते दहा रुपयांच्या हिशोबाने दिले जाईल. मात्र हेच जेवण मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांना फक्त पाच रुपयात उपलब्ध होईल. आपल्या राज्यातील कोणताही नागरिक उपाशी झोपू नये असा हेतू ठेवत शिवराज चौहान यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

इतकेच नव्हे तर, त्यांच्याकडून आणखीन एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे, 38,505 बेघर लोकांना जमीन मिळवून देणे. शिवराज चौहान यांनी, अंतर्गत शहरी भागातील 38,505 बेघर लोकांना जमीन देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात कोणताही व्यक्ती विना घराचे राहणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. असा दोन प्रमुख घोषणा शिवराज चौहान यांनी केल्या आहेत. त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.