आता Netflix पाहता येणार विनामूल्य; ते कसे? लगेच जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| OTT प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या वेब सिरीजला सर्वात जास्त पसंती मिळते. त्यामुळे यावर रिलीज होणारे नवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यासाठी अनेकजण दुसऱ्यांचा पासवर्ड वापरतात किंवा इतरांना नेटफ्लिक्सचा रिचार्ज करायला सांगतात. मात्र आता अशा लोकांची ही अडचण दूर होणार आहे. कारण आता इथून पुढे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनशिवाय वापरता येणार आहे. म्हणजेच, तुम्हाला नेटफ्लिक्स पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही. ते कसे जाणून घेऊयात.

नुकतेच जिओने दोन खास प्लॅन्स ग्राहकांसाठी आणले आहेत. जिओचे हे दोन्ही प्लॅन्स अमर्यादित कॉलिंग, डेटा, मेसेजसह
विनामूल्य Netflix वापरण्याची सुविधा देत आहे. खास म्हणजे, या दोन्ही प्लॅन्सची वैधता 84 दिवस आहे. यावर 5G अमर्यादित डाटा मिळत आहे. हे प्लॅन्स कोणते आहेत जाणून घेऊयात.

पहिला 1099 रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओचा 1099 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांचा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस, दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग मिळत आहे. 84 दिवसांच्या वैधतेदरम्यान जिओ 168GB इतका डेटा देत आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे, या प्लॅनमध्ये Netflix (Mobile) चे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. तसेच, JioTV, JioCinema आणि JioCloud या गोष्टी देखील ग्राहक विनामूल्य वापरू शकतो.

दुसरा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओने आपल्या ग्राहकांसाठी 1499 रुपयांचा 84 दिवसांच्या प्रीपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, दररोज 3GB डेटा मिळत आहे. म्हणजेच तुम्हाला 84 दिवसांमध्ये जिओ 252GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये देखील जिओ तुम्हाला मोफत Netflix उपलब्ध करून देत आहे. तसेच तुम्ही, JioTV, JioCinema आणि JioCloud या सर्व गोष्टी विनामूल्य वापरू शकता.