ATM In Train : आता ट्रेनमधूनही काढता येणार पैसे ; धावत्या ट्रेनमध्ये ‘कॅश ऑन ट्रॅक’, ‘या’ गाडीत सुरु झाली सेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ATM In Train : रेल्वे प्रवास करताना अचानक पैशांची गरज भासली, आणि जवळ काहीच नव्हतं? अशी अडचण आता भूतकाळात जमा होणार आहे! कारण, आता प्रवासी धावत्या ट्रेनमधूनही थेट एटीएममधून पैसे काढू शकणार आहे. तेही देशात प्रथमच!

मुंबई ते मनमाडदरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएम बसवण्यात आलं असून, ही सुविधा (ATM In Train) मिळवणारी ही भारतातील पहिली ट्रेन ठरली आहे. ‘चलती ट्रेन, पैसे ऑन डिमांड’अशी सुविधा प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने क्रांतिकारी ठरणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये विशेष तांत्रिक सुधारणा करून तयार करण्यात आलेल्या कोचमध्ये हे एटीएम बसवण्यात आलं आहे. हे एटीएम पंचवटी एक्स्प्रेसच्या एसी चेअर कारमध्ये लावण्यात आलं असून, बँक ऑफ महाराष्ट्रने ते पुरवलं आहे. विशेष म्हणजे, सुरक्षिततेसाठी याला मजबूत शटर आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (ATM In Train)

रेल्वे आधिकाऱयांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की , “धावत्या ट्रेनमध्ये (ATM In Train) एटीएम सुरळीत चालावं यासाठी खास विद्युत प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही सुविधा म्हणजे प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा आहे.” मंगळवारी सकाळी एटीएम युक्त पंचवटी एक्स्प्रेस मुंबईत दाखल झाली आणि रेल्वे इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला.

तथापि, गर्दीच्या वेळी सुरक्षेचं आव्हान कायम असणार आहे, विशेषतः फिरणाऱ्या गर्दुल्यांपासून संरक्षण महत्त्वाचं ठरणार आहे. तरीही, ही सुविधा भविष्यात इतर गाड्यांमध्येही लागू करण्यात येईल अशी शक्यता आहे.