हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता एकविसावे शतक सुरू असून डिजिटल पेमेंटने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे .अगदी छोटा कारणापासून ते मोठ्या कारणापर्यंत डिजिटल माध्यमांचा वापर होत असताना दिसतो. पण काही ठिकाणी तुम्हाला कॅशने व्यवहार करणे बंधनकारक असते , अशावेळी तुम्ही एटीएम कार्डचा वापर करून कॅश काढता. पण तुम्हाला माहित आहे का आता आधार कार्डच्या साह्याने देखील पैसे काढले जाऊन शकतात.
AEPS म्हणजे काय
आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (AEPS) ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची एक सेवा असून, ज्यामध्ये आधार क्रमांक आणि बायोमॅट्रिक डेटा वापरून बँकिंग सेवा दिली जाते. यामध्ये कॅश विड्रॉल, बॅलन्स चेक, मिनी स्टेटमेंट, फंड ट्रान्सफर आणि मायक्रो एटीएमद्वारे सेवा उपलब्ध आहेत.
कसे कढता येणार पैसे ?
जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, तर खालील पद्धत वापरून तुम्ही आधारच्या मदतीने पैसे काढू शकता.
- प्रथम तुम्ही AEPS सेवा देणाऱ्या बँकिंग एजंटकडे किंवा मायक्रो एटीएमवर जावा .
- ही सुविधा ग्रामीण भागात, बँक शाखांमध्ये, तसेच मोबाइल बँकिंग सेवांमध्ये मिळू शकते.
- नंतर मायक्रो एटीएमवर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाका.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर फिंगर प्रिंट असा ऑप्शन येईल तिथे फिंगरप्रिंट देऊन बायोमेट्रिक करून घ्या.
- ही प्रक्रिया केल्यानंतर स्क्रीन वरती अनेक ऑप्शन दिसतील ,त्यातील कॅश विड्रॉवल ऑप्शनवर क्लिक करा.
- तुम्हाला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी रक्कम तेथे टाका.
- ही रक्कम तुम्हाला काही क्षणातच मिळेल.
- त्यानंतर लगेच तुम्ही लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे डेबिट झालेले आहेत असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल.