Friday, June 9, 2023

विजेला करा आता टाटा- बायबाय ! आता फक्त आवाजाने चार्ज होणार स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्टफोन क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामध्ये अधिक क्षमतेच्या बॅटरीसोबतच फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळत आहे. आता चीनची Xiaomi कंपनी एका खास डिव्हाइसवर काम करत आहे. ज्यामुळे केवळ आवाजाच्या मदतीने स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाइसची बॅटरी चार्ज होणार आहे.

लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड शाओमीने या नवीन तंत्रज्ञानासाठी पेटेंट फाईल केले आहे. शाओमीच्या साउंड चार्जिंग पेटेंटचा फोटो चीनच्या नॅशन इंटेलेक्चूअल प्रॉपर्डी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनवर पाहण्यात आला. शाओमी या पेटेंटचा उपयोग एक साउंड चार्जिंग डिव्हाइस, एक एनर्जी स्टोरेज डिव्हाइस आणि एका इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससाठी करण्यात येणार आहे. हे डिव्हाइस आवाज जमा करणे आणि त्याच्या इनवायरमेंटल वायबर्शनद्वारे मॅकेनिकल वायब्रेशनमध्ये बदल करणार आहे.

या मॅकेनिकल डिव्हाइसला इलेक्ट्रिक करंटमध्ये बदलण्यासाठी शाओमी ग्राहकांना एक डिव्हाइस देणार आहे. हे डिव्हाइस AC करंटला DC करंटमध्ये बदलणार आहे. कंपनीने दावा केला आहे कि,हे तंत्रज्ञान विना पॉवर सॉकेटचे स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाइसलादेखील चार्ज करणार आहे. याव्यतिरिक्त शाओमीने आपल्या २००वॉट हायपरचार्ज तंत्रज्ञानाची देखील घोषणा केली आहे. यानुसार ४०००एमएएचची बॅटरीला फक्त ८ मिनिटात चार्ज करता येणार आहे. कंपनीने नवीन एमआय एअर चार्जरला सादर केले आहे यानुसार केबल अथवा स्टँडशिवाय डिव्हाइसला चार्ज करता येणार आहे. यामुळे एकाच वेळी अनेक डिव्हाइस चार्ज करता येणार आहे. मात्र याबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.