NPS-APY खातेधारकांना दिलासा, आता UPI द्वारेही भरता येणार पैसे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) च्या खातेदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. खरं तर, पेन्शन फंड नियामक PFRDA च्या दोन पेन्शन योजनांच्या सदस्यांना आता युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे देखील त्यांचे योगदान देता येणार आहे. शुक्रवारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (PFRDA) एका निवेदनात ही माहिती देण्यात आली.

Assets under NPS rose to over ₹6 trillion as of 30 June: PFRDA | Mint

आत्तापर्यंत नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) आणि अटल पेन्शन योजने (APY) च्या खातेदारांना IMPS/NEFT/RTGS वापरून नेटबँकिंग खात्याद्वारे आपले ऐच्छिक योगदान थेट पाठवता येत होते, आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. PFRDA ने सांगितले की, “आता UPI द्वारे देखील रक्कम जमा केली जाऊ शकते, ज्यामुळे योगदान जमा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल.”

Atal Pension Yojana enrolments cross 3.30 cr; 28 lakh new additions in FY22 - BusinessToday

NPS आणि APY मधील फरक

हे लक्षात घ्या कि, NPS ही योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाते तर APY ही योजना असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरने याबाबत सांगितले की,”सकाळी 9.30 पूर्वी मिळालेले योगदान त्याच दिवशी केलेली गुंतवणूक म्हणून गणले जाईल, तर त्या वेळेनंतर मिळालेली रक्कम दुसऱ्या दिवशीच्या गुंतवणुकीसाठी मोजली जाईल.”

upi: Explained: UPI ID and how it works

UPI म्हणजे काय ???

यूपीआयही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. याद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी मिळते. याची एक खास गोष्ट अशी कि यूपीआयद्वारे कधीही, रात्री किंवा दिवसा पैसे ट्रान्सफर करता येतात.

Nepal to Use India's UPI Payments System | PYMNTS.com

UPI सिस्टीम कशी काम करते ???

यूपीआयसुविधा वापरण्यास अगदी सोपी आहे. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये पेटीएम, फोनपे, गुगल पे, भीम इत्यादी कोणतेही UPI App डाउनलोड करावे लागेल. बँक खाते यूपीआयApp शी लिंक करून ही सिस्टीम वापरता येईल. यूपीआयद्वारे, आपल्याला एक बँक खाते एकापेक्षा जास्त यूपीआय App शी लिंक करता येते. त्याच वेळी, एका UPI App द्वारे अनेक बँक खाती देखील ऑपरेट केली जाऊ शकतात.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview

हे पण वाचा :

सुप्रीम कोर्टाच्या वकीलाकडून Aamir Khan विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल !!!

भारतातील Palm Oil ची आयात घटली तर सोया तेलाची आयात 125 टक्क्यांनी वाढली !!!

PM Awas Yojana चा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला !!! कोणा-कोणाला करता येईल अर्ज ते पहा

‘या’ कार्डच्या साहाय्याने Flipkart वर मिळवा 12% पर्यंतचा कॅशबॅक !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर पहा