NPS Vatshalya Scheme | भविष्याचा विचार करून अनेक लोक काही ना काही गुंतवणूक करत असतात. सरकारकडून देखील अनेक योजना राबवले जातात. ज्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करता येते. अशातच सरकारचे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS Vatshalya Scheme) ही एक पेन्शन योजना आहे. ज्याद्वारे आपल्याला गुंतवणूक करता येते. आणि एक खात्रीशीर उत्पन्नाची देखील आपल्याला दखल मिळते. ही गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळासाठी करता येते.
या योजनेत आता पालकांना त्यांच्या मुलांसाठी देखील गुंतवणूक करता येणार आहे. याबाबतची माहिती आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी केलेल्या अर्थसंकल्पात सादर केलेली आहे. त्यांनी एनपीएस वात्सल्य योजनेची देखील घोषणा केली आहे.
या योजनेअंतर्गत पालक आता त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी (NPS Vatshalya Scheme) देखील या योजनेमध्ये योगदान देऊ शकतात. त्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर ही स्कीम सामान्य एनपीएस खात्यामध्ये रूपांतर केली जाईल. तसेच एनपीएससाठी एक आणखी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ती म्हणजे आता नियुक्त त्यांचे योगदान हे 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात आलेले आहे.
अनेक लोक सध्या आपल्या रिटायरमेंटच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. मार्केटमध्ये सध्या अनेक योजना आलेल्या आहेत. याआधी ही योजना केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. परंतु 2009 पासून सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS Vatshalya Scheme) सुरू केली आहे.