NVS Recruitment 2024 | नवोदय विद्यालयात नोकरीची मोठी संधी; ‘ही’ आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख

NVS Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NVS Recruitment 2024 | आपल्याला देखील सरकारी नोकरी असावी, असे अनेक तरुणांचे स्वप्न असते. कारण सरकारी नोकरीमध्ये आपले भविष्य सुरक्षित असते. आम्ही तुम्हाला नेहमीच सरकारी नोकरीच्या विविध संधीबद्दल सांगत असतो. आज देखील आम्ही तुम्हाला सरकारी नोकरीबद्दल माहिती सांगणार आहोत.

नवोदय विद्यालयाच्या समितीने (NVS Recruitment 2024) काही दिवसांपूर्वी शिक्षकेतर पदांसाठी भरती जाहीर केली होती. त्याचप्रमाणे 30 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. असे देखील त्यांनी सांगितलेली होते. परंतु आता ही अर्ज करण्याची तारीख त्यांनी वाढवलेली आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत कधी? | NVS Recruitment 2024

आता नवोदय विद्यालयात शिक्षकेतर भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 ही आहे. त्याचप्रमाणे अर्ज दुरुस्त्या करण्यासाठी 9 मे ते 11 मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. अर्ज दुरुस्तीची तारीख या आधी 2 ते 4 मे ही ठेवण्यात आलेली होती. परंतु आता मुदतवाढ करून अंतिम तारीख ही बदलण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत नॉन टीचिंग पदे भरण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 1577 रिक्त पदांची भरती होणार आहे.

अर्ज कसा करावा

  • अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जा.
  • होमपेजवर, अधिसूचना/रिक्त जागा विभागात जा.
  • “एनवीएस मध्ये Non-Teaching posts of HQ/RO and JNV Cadre in NVS थेट भरतीसाठी या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • स्क्रीनवर एक पीडीएफ दिसेल , त्यात दिलेली सविस्तर माहिती पहा, पीडीएफ डाउनलोड करा.

कोणत्या पदांवर होणार भरती?

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मेस हेल्पर, एमटीएस कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, सहाय्यक विभाग, अधिकारी, लेखा परीक्षण, सहाय्यक लघुलेखक इत्यादी व त्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 18 ते 40 दरम्यान आहे. त्यांना या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. सामान्य वर्गातील उमेदवारांना 1500 रुपये फी असणार आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी कॅटेगिरीतील उमेदवारांना 500 रुपये फी असणार आहे