OBC विद्यार्थ्यांना मिळतायेत 60 हजार रुपये; त्याकरिता ‘या’ योजनेसाठी अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे. आता राज्य सरकारने ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ओबीसी विद्यार्थ्याला दरवर्षी 60 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक मदत करण्यात येते. सरकारकडून ही मदत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येते. आजवर या योजनेचा अनेक ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो या संबंधित माहिती जाणून घ्या. (Government Scheme)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

OBC विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कसलीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी सरकारकडून सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना दरवर्षाला 60 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही योजना महाराष्ट्र सरकार आणि इतर मागास बहुजन विकास मंडळाकडून राबवण्यात येत आहे. या योजनेचा फक्त ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

महत्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आर्थिक मदत प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. यामध्ये पुणे मुंबई शहरांसाठी योजनेचीत एकूण रक्कम 60 हजार रुपये इतकी आहे. तर महापालिका क्षेत्रासाठी एकूण 51,000 रुपये आणि जिल्हा-तालुका स्तरावर 43 हजार रुपयांची मदत करण्यात येते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थी हा ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
महाविद्यालयातील किंवा शाळेतील नोंदणीचा पुरावा
बँक पासबुक
उत्पन्नाचा दाखला
10 वी 12 वी प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा?

या योजनेस संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी महाडीबीटी वेबसाइटला भेट द्या तसेच, बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयात जाऊन देखील या योजनेसंदर्भात माहिती जाणून घेता येऊ शकतात.